
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी येथील ३२ वर्षीय युवक कल्पेश एकनाथ कांबळी याचा मृतदेह वायगणी, नांद्रुकवाडी येथील पाण्याच्या विहिरीमध्ये आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आज सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहिती नुसार वायंगणी साळगावकरवाडी येथील सिताराम माडये यांनी याबाबत खबर दिली आहे. यात म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कल्पेश हा घरी हॉलीबॉल खेळण्यासाठी जातो असे सांगून गेला. मात्र उशिरा पर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू केली. सर्वत्र शोध घेत असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह वायगणी, नांद्रुकवाडी येथील पाण्याच्या विहिरीत दिसून आला. पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदन साठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी अधिक तपास हेडकॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.