नवाबाग समुद्र किनारी आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन
Edited by: दिपेश परब
Published on: April 10, 2023 17:41 PM
views 422  views

वेंगुर्ला : 

येथील उभादांडा नावबाग समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. आज दुपारी ३ वाजता हा मृतदेह समुद्र किनारी लागला. दरम्यान याबाबत स्थानिकांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्याला खबर दिल्यानंतर वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह किनाऱ्यावर आणत पंचनामा केला आहे. दरम्यान अद्यापपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नसल्याने याबाबत माहिती असल्यास वेंगुर्ला पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन वेंगुर्ला पोलिसांनी केले आहे.