बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला शेत विहिरीत

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 02, 2023 19:43 PM
views 1114  views

कुडाळ : आकेरी गावडेवाडी येथील मनोज महादेव गावडे (वय ३२) याचा मृतदेह गावडेवाडी येथील शेत विहिरीत आढळून आला. हा युवक १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजल्यापासून घरातून बेपत्ता होता. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गणेश सखाराम गावडे यांनी फिर्याद दिली आहे.

गावडेवाडी येथील मनोज महादेव गावडे हा १ सप्टेंबर रोजी घरी कुणालाही न सांगता निघून गेला दरम्यान काल १ सप्टेंबर रोजी रुपेश गावडे यांच्या शेत विहिरी जवळ चप्पल आणि पाण्यावर कपडे तरंगताना आढळून आले होते. त्यावेळी रेस्क्यू पथकाने या विहिरीत उतरून तपासणी केली होती. मात्र काल (शुक्रवारी) काही आढळून आले. नाही. दरम्यान आज (शनिवारी) सकाळी मनोज गावडे याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.