
दोडामार्ग : कोलझर येथून 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मीनाक्षी नारायण मुंगी ( 40 ) या विवाहितेचा मृतदेह शनिवारी कळणे नदीपात्रात रेडिघाटी येथे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहे. कोलझर येथील मीनाक्षी मुंगी ही महिला चार दिवसांपूर्वी घरातून कोणालाही नसांगता निघून गेली. तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. घरातील मंडळींनी शोधा शोध करूनही टी कुठेच आढळून आली नाही. त्यामुळे टी बेपत्ता असल्याची तक्रार दोडामार्ग पोलिसात करण्यात आली होती.
शनिवारी मासे पकडण्यासाठी काही युवक कळणे रेडी घाटी परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना नदीपत्रात महिलेचा मरूदेह निदर्शनास आला. त्यांनी गावात सांगितल्यावर ती कोलझर येथील बेपत्ता विवाहित बेपत्ता असल्याचे समजले तीच्या घरचानी ओळख पटवली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.