माडखोल धरणात बुडालेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2024 14:03 PM
views 1087  views

सावंतवाडी : माडखोल येथील धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर सापडला. अक्षय सद्गुरू चव्हाण (वय २८, रा. कुणकेरी-परसदळावाडी) असे त्याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.त्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता.

अक्षय हा आपल्या मित्रासमवेत माडखोल धरणावर पोहण्यासाठी आला होता. त्याने धरणाच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, तो बराच वेळ झाला तरी तो  बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. मात्र, तो आढळून आला नसल्याने त्यांनी अक्षयच्या कुटुंबियांना त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व  शोधकार्य सुरू होते. अखेर त्याचा मृतदेह आढळला.