
वैभववाडी : सोनाळी बौद्धवाडी येथील बेपत्ता तरुण अंकित पांडुरंग भोसले ( वय२३ ) याचा मृतदेह सापडला. घराच्या मागील बाजूस जंगलात सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. अंकीत हा २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर त्याचे चुलते संतोष भोसले यांनी पोलीसांत दिली होती. पोलीस व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडून आला नाही. अखेर आज घराच्या मागील जंगलात त्याचा मृतदेह सापडला आहे.