
कणकवली : गडनदी पात्रातील मृतदेहाची ओळख पटली आहे. शिवचरणकुमार उदा चव्हाण (वय २४) मुळ रा. ता.सिहान, बिहार, सद्या मालवण हा चार दिवसांपूर्वी कणकवली येथे चुलत्याकडे आला होता. त्याचा मृतदेह नदीपात्रात दुपारी १.३० वाजता नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड यांना दिसला होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो नदी किनारी गेला असता घसरून पडला असवा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबतची खबर कणकवली पोलीस ठाण्यात नगरपंचायत कर्मचारी प्रवीण बाळकृष्ण गायकवाड यांनी दिली आहे. शिवचरणकुमारचा भाऊ हा मोलमजुरी करण्यासाठी सध्या मालवण येथे राहत आहे.
गडनदी पात्रात मृतदेह आढळला असल्याची माहिती नगरपंचायत कर्मचारी यांनी पोलिसांना कळवताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर,अनिल हाडळ, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, स्थानिक गुन्हे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके,श्री. देसाई व जामदार किरण कदम यांनी पाहणी केली. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांना मिळालेल्या फोटोच्या आधारावर आवाहन केले होते. त्यामुळे शिवचरणकुमार याची ओळख पटली आहे. शिवचरणकुमार हा चार दिवसापूर्वी मालवणहून कणकवली येथे नातेवाईकांकडे आला होता. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.