
कुडाळ : कुडाळ पिंगुळी समर्थनगर येथे एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती समोर आली नसली तरी कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधीक तपास करीत आहेत. या व्यक्तीच्या हातात औषधे भरलेली पिशवी आहे. ही व्यक्ती कुडाळ मधीलच असण्याची शक्यता असून या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध कुडाळ पोलिस घेत आहेत.