पावसाळी हंगामात होडी सेवा 'या' कालावधीत राहणार बंद !

जिल्हा प्रशासनाची माहिती
Edited by: ब्युरो
Published on: May 13, 2024 06:53 AM
views 568  views

सिंधुदुर्गनगरी : Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना दरवर्षी 26 मे 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात बंदी करण्याबाबत निर्देशित केली असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समुह, सिंधुदुर्ग कॅ. एस.व्ही. भुजबळ यांनी दिली आहे. 


पावसाळ्याच्या सुरुवाती पासून खराब हंगाम सुरु होणे अपेक्षित असते. त्यामुळे जीवन आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना 26 मे 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामाच्या कालावधीत वापरास बंदी करण्यास आलेली आहे. तरी सर्व नौका मालकांनी व जलक्रीडा प्रवासी वाहतूक व्यावसायिकांनी नोंद घ्यावी.