
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह वर्ग १ येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अभिविक्षक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला इतर मान्यवर सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा न्यायाधीश यांचे स्वागत कारागृह अधीक्षक श्री. कांबळे यांनी केले. यानंतर अध्यक्षांनी आणि उपस्थित मान्यवर सदस्यांनी संपूर्ण कारागृहाची पाहणी केली. तसेच आवश्यक कामांबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहासाठी वैद्यकीय अधिकारी पद उपलब्ध करून देण्याबाबत आणि सावंतवाडी जिल्हा कारागृहासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत रुग्णवाहिका घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीच्या आयोजनासाठी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन केले.कारागृहाच्या पाहणीदरम्यान, सिंधुदुर्ग कारागृहाचे अधीक्षक संजय मयेकर आणि सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सतीश कांबळे यांनी संबंधित कारागृहांबाबत सविस्तर माहिती दिली.