
सावंतवाडी : एलायझा टेस्ट बंधनकारक करण्यात आल्यानं उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णाला 'ओ पॉझिटिव्ह' या रक्तगटाच्या दहा रक्तदात्यांची आवश्यकता होती. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या दात्यांनी पुढाकार घेत रक्तदान करत रूग्णांना जीवनदान द्यावं असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल होत. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल दहा जणांनी एकावेळी रक्तदान करत रूग्णाला जीवनदान दिलं आहे. यामध्ये वैभव सावंत, प्रभाकर वडार,सुधीर माळकर, इंद्रनील अनगोळकर,अनिकेत सावंत, अमेय सुकी, अथर्व सावंत, मिनिन फर्नांडिस, दत्तात्रय पंडित, प्रदीप सावरवाडकर यांनी ओ पॉझिटिव्ह गटाच रक्तदान केल.
दरम्यान, गोवा मणिपाल रूग्णालयात ओ पॉझिटिव्ह गटाची आवश्यकता असताना अवधूत गावडे, वैभव दळवी, संदेश पाटील यांनी ओ पॉझिटिव्ह गटाच रक्तदान केलं. तर ओरोस येथे बालकाला ओ निगेटिव्ह प्लेटलेट्सची आवश्यकता असताना सागर साळगावकर यांनी प्लेटलेट्स डोनेट केले. या सर्व दात्यांचे तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचे रूग्णांनी व नातेवाईकांनी ऋण व्यक्त केले.