विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस इथं 16 जानेवारीला रक्तदान शिबीर !

संस्थापक कै. आनंद पांगम यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजन
Edited by: जुईली पांगम
Published on: January 12, 2024 06:40 AM
views 84  views

बांदा : आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. आनंद उर्फ भाऊ पांगम यांच्या स्मृतिदिनी १६ जानेवारीला रक्तदान शिबिराचं  आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमही होणार आहे. विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस इथं सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, संजय गांधी निराधार समिती सावंतवाडी अध्यक्ष गजानन नाटेकर तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिक्षक मोहन पालेकर (9422779833) यांच्याशी संपर्क साधावा.