देवगडात विठ्ठल मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 18, 2023 19:58 PM
views 90  views

देवगड : शनिवार दि.१८ नोव्हेंबर रोजी विठ्ठल मित्रमंडळ ,विठ्ठलवाडी ता.देवगड यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे - आपला दवाखाना खालची बाजारपेठ  येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्यांदाच रक्तदान  शिबिराचे आयोजन या वेळी करण्यात आले होते. यावेळी ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून बहुमोल योगदान दिले. आणि विशेष म्हणजे ३ महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.या वेळी प्रसिद्ध टी व्ही मालिका कलाकार श्री.विद्याधर कार्लेकर, उद्योगपती श्री उत्तमशेठ पोकळे ,श्री .सुनील पारकर ,श्री सतिष खानविलकर ,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड सचिव श्री प्रकाश जाधव ,जिल्हा सल्लागार श्री उद्धव गोरे ,जिल्हा सदस्य श्री विजयकुमार जोशीआणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि रक्तदाते,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हा रक्तपेढी वैद्यकिय अधिकारी आणि त्यांची सर्व टीम यांचे उत्तम सहकार्य लाभले.

दिनेश पारकर, आपला दवाखान्यातील पेडणेकर सिस्टर, घाडी मॅडम यावेळी उपस्थित होत्या.