मुस्लिम वेलफेअर सावंतवाडीच्यावतीने रक्तदान शिबिर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:21 PM
views 14  views

सावंतवाडी : मुस्लिम वेलफेअर सावंतवाडीच्यावतीने कादरी मशिद उभाबाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्त हे नैसर्गिक असल्याने ते कोणालाही बनवता आलेले नाही. तसेच माणसाने कितीही प्रगती आणि कितीही शोध लावला तरी त्याला रक्त बनवता येणार नाही. कारण निसर्गाने जो माणूस बनवला त्या माणसाच्या शरीरात रक्त तयार होण्याची प्रक्रिया घडते. त्यामुळे आपण कोणत्या धर्मात आहोत कोणत्या जातीत आहोत याचा कोणतेही बंधन रक्ताची गरज असते तेव्हा लागत नसते असं मत उपस्थितांनी व्यक्त केले.

रक्तदाता हाच अल्लाह, ईश्वर याच्या रूपाने येतो आणि जीव वाचवतो. रक्तदाता हा जात, धर्म, वंश ,पंथ असा कोणताही भेद करत नाही .समोरचा व्यक्ती हा माणूस आहे आणि त्याचा अथवा तिचा जीव वाचला पाहिजे हे एकच धेय्य रक्तदात्या समोर असते अस मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. ‌सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण, अँड.संदीप निंबाळकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, कुडाळचे माजी नगरसेवक इजाज नाईक आदींच्या प्रमुख उपस्थितीत  पहिल्यांदाच सावंतवाडी येथील कादरी मशिद येथे मुस्लिम समाजाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपले विचार मान्यवरानी  व्यक्त केले. यापुढच्या काळामध्ये मुस्लिम बांधव अधिकाधिक रक्तदान करतील आणि रक्तदात्यांचा एक मोठा गट तयार होईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. यावेळी हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्मातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले . सर्व रक्तदात्यांना पोलिस निरीक्षक यांनी प्रशस्तीपत्र दिले. मान्यवरांचे जहांगीर बेग यांनी आभार मानले. 

यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, अँड.संदीप निंबाळकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, कुडाळचे माजी नगरसेवक इजाज नाईक, वंचित बहुजन आघाडीचे महेश परुळेकर, सिंधू रक्त मित्र संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, मुस्लिम वेलफेअरचे अध्यक्ष बाबू करोल ,उपाध्यक्ष रफिक मेमन , सेक्रेटरी चांद मेहनुद्दीन करोल,आरिफ करोल , अनिस बिजली ,सुलतान समजा , तौकिफ आगा , जाफर खानापुरी , तबरेज पडवेकर , दादा पडवेकर सलीम अखबानी , शफिक खान, महंमद समेजा आदि उपस्थित होते.