
देवगड : देवगड तळवडे येथे ग्रामपंचायत तळवडे व भाकरवाडी युवक क्लब यांच्या वतीने बुधवार दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी, सकाळी ९ ते दुपारी १ वा. ग्रामपंचायत हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.भाकरवाडी युवक क्लब तळवडे आणि ग्रामपंचायत तळवडे यांच्यावतीने या रक्तदान शिबिर चे आयोजित करण्यात आले आहे. तळवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन भाकरवाडी युवक क्लब चे अध्यक्ष प्रसाद दुखंडे आणि सरपंच गोपाळ रुमडे यांनी केले आहे.










