
रत्नागिरी : घरडा अभियांत्रिकी महाविदयालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्रतिवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. घरडा फाउंडेशनचे संस्थापक, शास्त्रज्ञ पदमश्री डा. के.एच घरडा सरांना आदरांजली देण्याच्या निमित्ताने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डा. घरडा यांचे रसायन आणि अग्रोकेमिकल उद्योग क्षेत्रात केलेल्या नवीन शोधांचे व उत्पादनांचे बहुमुल्य असे योगदान आहे. 2016 साली त्यांना रसायन संशोधनातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पदमश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्याच्या प्रेरणेतून निर्माण झालेले घरडा अभियांकत्रिकी महाविद्यालय व बाई रतनबाई घरडा हास्पिटल आजही त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील योगदानाची साक्ष देत आहेत.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन महाविदयालयातील एनएसएस विभाग व जनकल्याण रक्त संकलन केंद्र महाड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये महाविदयालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालकांनी देखील सहभाग नोंदविला. सदर शिबीरासाठी कौशिक साठे, प्रथमेश पाबे आणि तनुजा जाधव यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहीले. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. वैभव कांबळे, प्रा. डा. एस. के पाटील प्रा. मुंन्घाटे यांचे मार्गदर्शन लाभले.