करुळमध्ये रक्तदान शिबीर ; ३२ जणांनी केले रक्तदान

शिवशंभो प्रतिष्ठान - सिंधूरक्तचे आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 28, 2025 18:28 PM
views 82  views

वैभववाडी :  करुळ येथे शिवजयंती व महाशिवरात्री उत्सव निमित्त शिवशंभो प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र परिवार सिंधुदुर्गच्या वतीने आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात एकुण ३२ जणांनी रक्तदान केले.

करुळ गावचे सरपंच नरेंद्र कोलते यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सचिन कोलते, शिवशंभो  प्रतिष्ठान अध्यक्ष बाळा कदम, कार्याध्यक्ष भैय्या कदम, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कदम, पोलिस पाटील सचिन पाटील, शिव शंभो प्रतिष्ठान सचिव अनंत पाटील, रूपेश वारंग व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ प्रशांत ढवण इतर मान्यवर उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या ३२ रक्तदात्यांचे शिवशंभो प्रतिष्ठानच्यावतीने आभार मानण्यात आले.

रक्तदान करणाऱ्यांमध्ये रामकृष्ण पांडुरंग कोलते, जितेंद्र बाबाजी गुजर, हिंदुराव श्रीधर पाटील, सचिन विजय कोलते, सचिन सुभाष पाटील, पांडुरंग तुकाराम शिवगण, अक्षय अशोक वळंजू,  दिपक दत्ताराम राशिवटे, रविंद्र दिपक लाड, संजय पांडुरंग कदम, विलास वसंत कोलते, संतोष मनोहर पाटील, रविंद्र शंकर सरफरे,  प्रदीप शिवाजी लाड, रत्नकांत परशुराम शिवगण, मंगेश सिताराम कोलते, संतोष कृष्णा कोलते, साहिल संतोष कोलते, सचिन गणपत शिंगरे, कुलदीप विश्वास सावंत, अक्षय विजय सावंत,  रामचंद्र तुकाराम शिवगण, यशवंत दत्ताराम कोलते, प्रथमेश प्रदीप कोलते, ऋतिक नागोजी पांचाळ, अमोल प्रकाश साळुंखे,  आकाश एकनाथ पोवार, अजय रामभाऊ पांचाळ, श्याम रामभाऊ गायकवाड, रुपेश श्रीकृष्णा वारंग, महेश (भैया) चंद्रकांत कदम यांचा समावेश आहे. यावेळी कोल्हापूर जीवन धारा ब्लड बँक चे डाॅ. नयनीश मोरे, डॉ. सुनील कांबळे, संकेत कांबळे, सुनील आवळे, रणजीत आकुर्डे व कर्मचारी उपस्थित होते.