प्रभाग क्र. 2मध्ये भाजपचा युवा चेहरा

अमृता फाटक यांना मिळतोय मतदारांचा प्रतिसाद
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 25, 2025 15:24 PM
views 35  views

मालवण : भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. अनेक क्षेत्रात आज तरुणांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ऐन तारुण्यात आपले नेतृत्व राज्य पातळी पर्यंत सिद्ध केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने नव्या जुन्यांचा योग्य ताळमेळ साधत काही ठिकाणी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युवा उमेदवारांना संधी दिली आहे. पालिकेच्या प्रभाग २ मध्ये सौ. अमृता अनिकेत फाटक या अशाच युवा उमेदवाराला भाजपने संधी दिली आहे. प्रचाराच्या पहिल्या फेरीत त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून होणारा सर्वांगीण विकास याची माहिती मतदारांना देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच का पाहिजे, हे पटवून दिले आहे. भाजपच्या या स्वच्छ व कर्तृत्ववान चेहऱ्यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्र. २ मधून मोठ्या मताधिक्याने विजयी होत मतदारांच्या आशीर्वादाने पक्षश्रेष्ठींचा विश्वास नक्कीच सार्थकी लावू, असा विश्वास  अमृता फाटक यांनी व्यक्त केला आहे.  युवा महिला चेहरा म्हणून अमृता अनिकेत फाटक या भाजपकडून कमळ या निशाणीवर रिंगणात आहे. फाटक कुटुंबीय सुसंस्कृत आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे म्हणून ओळखले जात आहे. सौ. अमृता याही आपल्या कुटुंबियांची ओळख कायम ठेवत समाज कार्यातून लोकसेवक होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांचे पती आंबा उद्योजक अनिकेत फाटक हे नेहमीच जनतेच्या संपर्कात असतात. अनेक सामाजिक कार्यात कोणताही बडेजाव मोठेपणा न करता अनिकेत फाटक सहभागी होऊन आपले योगदान देतात. त्यांचा फायदा अमृता फाटक, ललित चव्हाण व नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत यांना निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अमृता फाटक या उच्च शिक्षित उमेदवार असून त्यांचे पती अनिकेत फाटक हे प्रभागातील जनतेच्या सुखदुखात नेहमी पुढाकार घेऊन सहभागी होत असतात. प्रभागातील शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान असते. आपण विकसित भारताचे, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. ज्या विश्वासाने देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील जनतेने मतदान केले, आज तो विश्वास खरा ठरताना दिसत आहे. दोन्ही कार्यतत्पर नेत्यांच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार गतिमान पद्धतीने पुढे जाताना दिसत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास’ हे ब्रीद वाक्य केवळ कागदावर न राहता, प्रत्यक्ष कृतीत, प्रत्यक्ष अंमलात येत आहे. राष्ट्र नवनिर्माणच्या या प्रक्रियेत आपल्यालाअजून अनेक टप्पे गाठायचे आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा आहे. यासाठी आपलं ‘मत’ अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या मालवण या वैभवशाली नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. आपणामुळे यापूर्वीही भारतीय जनता पक्षाला याठिकाणी संधी मिळाली. त्यातून येथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेला दिलेली अभिवचने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मालवण हे शहर देशभरात नावारुपाला आले आहे. याच शिदोरीवर आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. भाजपचे नेते खासदार नारायण राणे, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्याला अनेक सन्मान प्राप्त करून देणारे, जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे आमचे नेते आहेत. या मान्यवरांच्या नेतृत्वात मालवण नगरपालिका निवडणूक आम्ही महिला भगिनी, युवामित्र यांच्यासह सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा सर्वांगीण विकास नक्की साधू, असा विश्वास उमेदवार सौ. अमृता अनिकेत फाटक यांनी व्यक्त केला आहे.