
कुडाळ : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी (NDA) ला दणदणीत विजय मिळाल्याबद्दल कुडाळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून, घोषणा देऊन मोठा जल्लोष साजरा केला.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. बिहारमधील या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या विजयाच्या सोहळ्यात भारतीय जनता पार्टीचे अनेक महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू राऊळ (राज्य परिषद सदस्य), बंड्या सावंत (जिल्हा उपाध्यक्ष), संध्या तेरसे (जिल्हा उपाध्यक्ष), रुपेश पावस्कर, सौ. अदिती सावंत (सरचिटणीस, महिला आघाडी), तन्मय वालावलकर (तालुकाध्यक्ष, युवा मोर्चा), सुनील बांदेकर (शहराध्यक्ष), राजू बक्षी, विशाखा कुलकर्णी, सचिन काळप (माजी नगरसेवक), आफरीन करोल (माजी नगराध्यक्ष), नारायण शृंगारे, सुनील सातार्डेकर, योगेश राऊळ, दिगंबर गोवरकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजपच्या विजयाचा आनंद उत्साहात साजरा केला.










