आचिर्णे सरपंचपदी भाजपाचे वासुदेव रावराणे यांची बिनविरोध निवड

जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे व ग्रामस्थ यांनी केले अभिनंदन
Edited by:
Published on: March 13, 2025 19:40 PM
views 97  views

वैभववाडी : आचिर्णे गावच्या सरपंचपदी भाजपाचे वासुदेव अनंत रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.  माजी सरपंच रुपेश रावराणे यांनी पक्षीय धोरणानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सरपंचपदाची जागा रिक्त होती. दरम्यान सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली. सरपंच पदासाठी वासुदेव रावराणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निवडणूक अधिकारी गंगाधर पाटील यांनी श्री रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी आचिर्णे सोसायटी चेअरमन जयसिंग रावराणे, माजी सरपंच रुपेश रावराणे, सुशिल रावराणे, सिध्देश रावराणे, उत्तम सुतार, सुनिल रावराणे, संतोष रावराणे, स्वप्नील दर्डे, सुभाष रावराणे, सौ.सारिका रावराणे, सुवर्णा रावराणे, सारिका कडु, संदिप कडु, अक्षय रावराणे, संतोष रावराणे, संतोष वायंगणकर, सुभाष रावराणे, चंद्रकांत सावंत, शेखर कडु, उदय रावराणे, मोहन रावराणे,शशिकांत रावराणे, सत्यवान जाधव, विजय तेली, महेश रावराणे व भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.