
बांदा : बांदा शहर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत घवघवीत यश संपादन केले. १५ पैकी ११ जागांवर भाजपने विजय मिळविला. प्रभाग क्रमांक ५ मधील लढत लक्षवेधी झाली. भाजपच्या रुपाली शिरसाट यांनी २८२ मत घेत ठाकरे सेनेच्या मनीषा सातोसकर (२१५ मते ) यांचा पराभव केला. याठिकाणी भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांना ३३९ मते तर अर्चना पांगम यांना १६५ मते मिळाली. रूपाली शिरसाट यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्यांचे पती सुधीर शिरसाट हे देखिल विजयी मिरवणूकीत सहभागी झाले होते