पणन महासंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रमोद रावराणे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल.

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 17, 2023 21:07 PM
views 182  views

वैभववाडी:

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे प्रमोद रावराणे रिंगणात उतरले आहेत.कोकण विभागातून सर्वसाधारण मतदार संघातून भाजपा शिवसेना युतीकडून  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.याच्या संचालक पदांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.कोकण विभागातून सर्वसाधारण प्रवर्गासाठी श्री रावराणे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.श्री रावराणे हे गेली अनेक वर्ष सहकारी संस्थेत काम करत आहेत.सध्या तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून काम करत आहेत.या अनुभवाचा निवडणुकीत त्यांना फायदा होणार आहे.