भाजपचं रामाच्या नावावर राजकारण : वैभव नाईक

Edited by: भरत केसरकर
Published on: April 27, 2024 12:44 PM
views 480  views

कुडाळ : नारायण राणेंचे विसर्जन करण्याची वेळ आता आली आहे. निवडणूक आल्यावर राणेंना रोजगार आठवतो आहे. तुमच्या दोन मुलांना जर्मनीला पाठवा.मग बारा हजार युवकांना जर्मनीत पाठवण्याची भाषा करा असा टोला नारायण राणेना वैभव नाईकांनी लगावला आहे. रामाच्या नावावर राजकारण करण्याचे प्रयत्न भाजपवाले करीत आहेत. मोदींच्या नावावर राजकारण करण्याचे भाजपने सोडून द्यावे.

विनायक राऊतांनी कधी दादागिरी केली का? माणगाव खोरे हा निष्ठावंताचा बालेकिल्ला आहे. अनेक शिवसैनिकांनी येथील सर्वसामान्य माणसाला आमदार केल आहे. त्यामुळे नारायण राणेंना पुन्हा एकदा पराभूत करा. असा शाब्दिक हल्लाबोल आमदार वैभव नाईक यांनी केला. माणगाव येथील विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आमदार वैभव नाईक यांनी केला.