
सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्त कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघामधील कारिवडे पंचायत समिती मतदार संघामधील कारीवडे, कुणकेरी, आंबेगाव या गावांमधील भारतीय जनता पार्टी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आरीवडेकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर, प्रमोद सावंत, कारीवडे सरपंच आरती माळकर, आंबेगाव सरपंच श्री. परब, कुणकेरी उपसरपंच सुनील परब, शक्ती केंद्रप्रमुख आनंद तळवणेकर, कुणकेरी शक्ति केंद्रप्रमुख कृष्णा उर्फ बाळा सावंत, सर्व बुथ अध्यक्ष महिला मंडल अध्यक्ष प्राजक्ता केळुस्कर, प्रमुख पदाधिकारी केशव साहिल बाळा गावकर विकास संस्थेचे सर्व चेअरमन भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुथ वर जाऊन बैठका घेण्यासंदर्भात नियोजन झाले. होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्त जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याला सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासंदर्भात या बैठकीत नियोजन झाले.