
बांदा : बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत बांदा नागरी विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार जावेद खतिब यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली विकासकाम व जनतेचा माझ्यावर असणारा विश्वास यामुळे बांदावासीय पुन्हा एकदा सदस्य म्हणून मला सर्वाधिक मतांनी विजयी करतील असा विश्वास जावेद खतिब यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला असून सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांच्यासह डोअर टू डोअर जात भाजपचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहचवला. कोरोना महामारीच्या काळात केलेले मदत कार्य, विजेचा प्रश्न,रस्त्याचा प्रश्न,व्यापारी व व्यावसायिकांचे प्रश्न, पूर-वादळ अश्या आपत्ती काळातील मदत कार्य,महिला व बालविकासा संबंधित शासनाच्या विविध योजनांचा लाभ,युवा सक्षमीकरण अशी सर्वच क्षेत्रातील लोकहिताची काम करण्यात जावेद खतिब यांचा पुढाकार असतो. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे प्रचारा दरम्यान त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेली पाच वर्षे सदस्य म्हणून केलेल्या विकास कामाच्या जोरावर मी पुन्हा मैदानात उतरलो आहे. येथील लोकांवर माझा विश्वास असून गेल्या टर्म प्रमाणे यंदाही सगळ्यात जास्त मतं देऊन ते मला निवडून देणार आहेत. देश व राज्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदी नेत्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकास होत आहे. त्यामुळे जनता बांद्यात भाजपच्या पॅनलालच आपला कौल देईल असा विश्वास जावेद खतिब यांनी व्यक्त केला. डोअर टू डोअर प्रचारावर भर देत त्यांनी प्रभाग पिंजून काढले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी उप सभापती शितल राऊळ, भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक, जावेद खतिब, श्रेया केसरकर, स्मिता पेडणेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.