
कणकवली : गाव चलो अभियान अंतर्गत सातरल कासरल गावातील ग्रामस्थांशी व लाभार्थिंशी संवाद साधत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या वेळी उपस्थित कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष संतोष कानडे, प्रवासी कार्यकर्ता तथा तालुका उपाध्यक्ष सोनु सावंत, बुध अध्यक्ष दिलीप तिरलोटकर, प्रदीप राणे, मनोज मांडवकर, संकेत राणे, सुशील राणे, समीर राणे,,शरद दळवी,,प्रसाद सावंत, बाबू राणे, पंढरी परब, मनोहर भामले, कांत राणे, महेश मेस्त्री आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने गरीब कल्याणच्या असून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत ह्या योजना सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे गावात भाजपच्या वतीने घर चलो अभियान राबवण्यात आल्याचे तालुका उपाध्यक्ष सोनु सवांत यांनी सांगितल.
.