भाजपचे 'चलो घर अभियान' | सावंतवाडीत महत्वाची बैठक

Edited by: विनायक गावस
Published on: September 28, 2023 12:39 PM
views 306  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा यांच्या वतीने बुधवारी भाजपा कार्यालय  सावंतवाडी येथे  महाविजय 2024 चलो घर अभियान या अभियाना अंतर्गत या अभियानाचे नियोजन करण्या संदर्भात सावंतवाडी विधानसभेची तातडीची व महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आणि सावंतवाडी माजी नगराध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्न देसाई , भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, भाजपा जिल्हा चिटणीस  एकनाथ नाडकर्णी, भाजपा जिल्हा चिटणीस महेश धुरी,भाजपा जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,दोडामार्ग तालुकाध्यक्ष  सुधीर दळवी शहर सरचिटणीस परीक्षित मांजरेकर, सरचिटणीस  विनोद सावंत,माजी नगरसेवक आनंद नेवगी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा निमंत्रित सदस्य रविंद्र मडगांवकर,बांदा मंडल पदाधिकारी गुरुनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, उमेश पेडणेकर तसेच मनवेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.