
सावंतवाडी : नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी शहर पिंजून काढल आहे. त्यांना अबालवृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपचा मोठा विजय श्रद्धाराजे यांच्या विजयान इथे होईल असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले.
युवराज्ञींनी देश, विदेश बघितला आहे. त्यांच्यकडे विकसित शहराची संकल्पना आहे. भाजपच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याची ताकद त्यांच्यात आहे. देशात सावंतवाडीच नाव उज्वल होईल असं कार्य त्या करतील. वेंगुर्ला नगरपरिषदेसारख नावलौकिक सावंतवाडीही त्यांच्या नेतृत्वाखाली करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.










