
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.
जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. या पक्षकार्य अहवालात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटन कार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला - युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याकडून रविंद्र चव्हाण यांना मार्गदर्शन लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.