
सिंधुदुर्गनगरी : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणानुसार मंडल अध्यक्ष निवडीमध्ये युवाशक्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चौदा मंडल अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी युवा भारतीय जनता पार्टीच्या क्रियाशील युवा कार्यकर्त्यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये खासदार नारायण राणे यांच्या अंतिम मान्यतेने सर्वानुमते ही निवड करण्यात आली. ही निवड करताना त्या त्या मंडळातील सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन सर्वानुमते ही नावे प्रदेशकडे निवड करण्यासाठी सादर करण्यात आली होती. प्रदेशच्या बैठकीत या सर्वच नावांवर सविस्तर चर्चा होऊन ही निवड करण्यात आली.
देवगड राजा भुजबळ
पडेल महेश नारकर
कणकवली शहर मिलिंद मेस्त्री
कणकवली ग्रामीण दिलीप तळेकर
वैभववाडी सुधीर नकाशे
ओरोस आनंद उर्फ भाई सावंत
कुडाळ संजय वेंगुर्लेकर
मालवण शहर विष्णू उर्फ बाबा मोंडकर
मालवण ग्रामीण धोंडी चिंदरकर
सावंतवाडी शहर सुधीर आडिवरेकर
बांदा स्वागत नाटेकर
आंबोली संतोष राऊळ
वेंगुर्ला विष्णू परब
दोडामार्ग दीपक गवस
दिनांक १ जानेवारी २०१५ रोजी सुरू झालेल्या संघटन पर्व अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सभासद नोंदणीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले त्याबद्दल देखील या बैठकीमध्ये सर्वांचे विशेष कौतुक करण्यात आले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना वाढीवर भर दिला जाणार आहे.