
दोडामार्ग : भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य लक्ष्मण ( बाळा ) नाईक हे महायुती सोडून अपक्ष उमेदवाराचे काम करत असल्या कारणाने त्यांना 6 वर्षासाठी जिल्हा सदस्य या पदावरून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबित केले आहे.
विधानसभा निवडणुकीचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक केसकर हे असताना दोडामार्ग येथील माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण ( बाळा ) नाईक हे महायुतीचे उमेदवार दीपक केसकर यांचे काम नकरता अपक्ष उमेदवार यांचे काम करत होते. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आदेश डावल्याने भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य या पदावरून त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांना दिले आहे.