
मालवण : मालवण कोळंब कातवडमध्ये उबाठाला धक्का बसला असून ग्रामपंचायत सदस्या निकिता बागवे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा कोळंब शक्तिकेंद्र प्रमुख मंगेश चव्हाण यांनी हा उबाठाला धक्का दिला आहे. या प्रवेशाने कोळंब ग्रामपंचायत मध्ये भाजपाची ताकद वाढली आहे.
शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोळंब शक्तिकेंद्र प्रमुख मंगेश चव्हाण यांनी उबाठाला धक्का दिला आहे. ग्रामपंचायत सदस्यां निकिता बागवे यांनी निलेश बागवे, सुनीता बागवे, सुरेश धुरी, सागर धुरी, संगीता धुरी, चेतन धुरी, दत्तगुरु धुरी, रत्नप्रभा धुरी, किशोर पवार, सेजल पवार, आशा पवार, संध्या पवार, गुरू नलावडे, महेश नलावडे, गीताबाई नलावडे, सत्यवान धुरी, वैशाली धुरी, राजेंद्र धुरी, रश्मी धुरी, अर्जुन धुरी, सरोजनी धुरी, सोहम धुरी, अर्चना धुरी, शुभांगी धुरी, आकाश चव्हाण, सुखदेव चव्हाण यांच्यासमवेत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी सरपंच सिया धुरी, संदीप भोजने, विजय ढोलम, तातोबा करलकर, भाई ढोलम, मनोहर कांबळी, सत्यवान लोके, भाऊ फणसेकर, दिगंबर लोके, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.