
वैभववाडी : कोकिसरे गावठण येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, भजनी बुवा संतोष वळंजू यांनी भाजपात प्रवेश केला. वैभववाडी भाजपा कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, संजय सावंत, विवेक रावराणे, कोकिसरे भाजपा पदाधिकारी बाळा वाडेकर, बंधू वळंजू, दत्ताराम सावंत, अनंत नेवरेकर, सुरेंद्र झोरे व कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असे यावेळी संतोष वळंजू यांनी सांगितले.