शिरगाव शेवरेचे उबाठा शाखाप्रमुख भाजपात !

Edited by:
Published on: November 07, 2024 20:44 PM
views 362  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव शेवरे येथील उबाठा चे शाखाप्रमुख संजय लक्ष्‍मण घाडी यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला असून त्यांच्या सोबत तेथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला आहे.  त्यांच्या समवेत उबाठाचे कार्यकर्ते संतोष मुरारी साटम यांनीही प्रवेश केला. 

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, पडेल मंडल विभागाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, देवगड मंडल विभागाचे तालुकाध्यक्ष राजू शेट्ये, युवा सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम, व भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांच्या दौऱ्यात ते ज्या गावात जातात त्या गावात उबाठाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपामध्ये येण्याची इच्छा व्यक्त करतात. शिरगाव येथे उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करताना सांगितले आमदार नितेश राणे म्हणजे नेता कसा असावा याचे उदाहरण आहे.त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आपण हा पक्ष प्रवेश करता असल्या बद्दल सांगितले आहे तसेच उत्तम लोकसंपर्क, विकासात्मक दृष्टी असलेला आमदार नितेश राणे सारखा दुसरा नेता नसल्याचे प्रवेश करणाऱ्या भाजप प्रवेश कर्त्यांनी म्हटले आहे.