
देवगड : देवगड बापर्डे येथील उ.बा.ठा चे गटप्रमुख संदीप घाडी, बूथ प्रमुख रामचंद्र वेद्रूक यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असून आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन आपण हा पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले आहे. तसेच आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. असे त्यांनीपक्ष प्रवेश करीत असताना सांगितले आहे. त्यामुळे बापर्डे जुवेश्वर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे, अमोल तेली, बंड्या नारकर, सरपंच संजय लाड, अजित राणे, संदीप नाईक धुरे, अनघा राणे हरिश्चंद्र नाईक धुरे आधी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संदीप घाडी रामचंद्र वेद्रूक,सुरेश येझरकर, अक्षय येझरकर, आशिष येझरकर, प्रशांत घाडी, यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मद्ये प्रवेश केला आहे.