
मालवण : मालवण तालुक्यातील कोळंब गावातील सरपंच व असंख्य कार्यकर्ते यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आज भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी स्वतः निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, राजू परुळेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.