वेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने डावखरेंच्या विजयाचा जल्लोष !

Edited by: दिपेश परब
Published on: July 02, 2024 11:44 AM
views 164  views

वेंगुर्ला :  लोकसभेच्या विजयानंतर पुन्हा एकदा कोकणात कोकण पधवीधर मतदार संघात भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. कोकण मतदार संघातुन आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक केली. त्यांच्या या विजया नंतर वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालया समोर महायुती तर्फे भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गंवडळकर व शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डूबळे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पेठे वाटून व घोषणा बाजी करुन जल्लोष केला. 

या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, वसंत तांडेल, किसान मोर्चा जिल्हा सदस्य बाळू प्रभु, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गंवडकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, सत्यविजय गावडे, कावेरी गावडे, समिर कांबळी, श्रेया मयेकर, आकांशा परब, स्नेहल पालकर, पल्लवी कांदे, प्रार्थना हळदणकर, सरीका मठकर, श्रद्धा धुरी, भुषण सारंग, पुंडलिक हळदणकर, विजय बागकर, नारायण गावडे, रविंद्र शिरसाट, सत्यवान पालव, गुरुनाथ घाडी, दादा केळूसकर, मनोहर तांडेल, अनिकेत पेडणेकर, हितेश धुरी, समिर नाईक, बंटि गावडे, महादेव नाईक, रविंद्र मुडंये आणि तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.