
वेंगुर्ले : परबवाडा गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. गेली १६ वर्ष भारतीय जनता पक्षाच प्रामाणिक काम करत असल्यामुळे केंद्रिय मंत्री नारायण राणे व पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी ही नेमणूक केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वेंगुर्ला मध्ये हेमंत गावडे यांना मानणारा मोठा युवा वर्ग असल्यामुळे नक्कीच याचा चांगला फायदा भाजपला होणार आहे.