
सावंतवाडी : लोकसभेचा निकाल लागून पाच दिवस झाले नाहीत अन् सावंतवाडी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षातील नेत्यांची आमदारकीच्या उमेदवारी वरून रस्सीखेच चालू आहे. पक्षाधक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते मान्य करणार आहेत. सावंतवाडी विधानसभेतील कार्यकर्त्यांनी या पूर्वी दोन वेळा पराभव पाहीला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते काय फक्त गोट्या खेळण्यासाठी नाही आहेत.या वेळेस ज्या उमेदवाराकडे जिंकण्याची क्षमता आहे त्या उमेदवारांचे नाव सर्वानुमते कार्यकर्ते ठरवून पक्षाध्यक्षांकडे पाठवणार आहेत असं मत चराठा उपसरपंच अमित परब यांनी व्यक्त केले.
या वेळेस आम्हाला निवडून येणाराच उमेदवार हवा आहे. त्यामुळे कोणी घाई करू नये.पक्ष प्रमुख जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल, महाराष्ट्रातील लोकसभेचा निकाल पहाता आमदारकीच्या उमेदवारीवर वाद करणे हा विरोधी पक्षाला फायदा होवू शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सबुरीने घ्यावे असे मत चराठा उपसरपंच अमित परब यांनी व्यक्त केले आहे.