वैभववाडीत उबाठाला धक्का ; नगरसेवक रणजीत तावडे भाजपात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 11, 2024 10:58 AM
views 247  views

वैभववाडी : वाभवे -  वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटीचे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांचे बंधू यांनीही भाजपच कमळ हाती घेतले. आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर हा प्रवेश झाला. श्री.तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत  उबाठाचे संख्याबळ केवळ एकच  राहिले आहे. या प्रवेशाने उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला आहे.

    विधानसभा निवडणुकीनंतरही उबाठातील आउटगोइंग काही थांबत नाही आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत विरोधी पक्षाची प्रखर भुमिका मांडणारे उबाठाचे नगरसेवक श्री तावडे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री भाजपा पक्ष केला. नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आम.राणेंनी स्वागत केले. 

वाभवे - वैभववाडी नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये रणजीत तावडे हे नगरसेवक पदावर निवडून आले होते. रणजीत तावडे, बाबा तावडे, अभिजीत तावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शहरात उबाठाला मोठा धक्का बसला आहे.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नगरसेवक प्रदीप रावराणे,भाजपा तालुका उपाध्यक्ष स्वप्निल खानविलकर, रितेश सुतार व कार्यकर्ते उपस्थित होते.