
दोडामार्ग : येणारी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या संजू परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आपल्या सोबत किती नगरसेवक आणले व परमे व कोलझर सोसायटी निवडणुकीत सत्ता आणलेल्या संचालकात स्वतः शिंदे शिवसेनेचे किती संचालक आहेत याचे आत्मपरीक्षण कराव आणि मगच स्वबळावर लढण्याच्या गोष्टी कराव्यात असे प्रत्युत्तर संजू परब यांना भाजपचे दोडामार्ग तालूकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिले आहे.
दोडामार्ग येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत कसई दोडामार्ग चे नगरध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, संजय सातार्डेकर, दीपक गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, भैया पांगम आदी उपस्थित होते.
दळवी पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघात दीपक केसररकर यांच काम भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केल होत. आणि त्यामुळेच ते निवडून आलेत याची जाणीव शिंदे शिवसेनाच्या प्रत्येकाने ठेवावी. ज्यावेळी विधानसभा निवडणूक लागली होती त्यावेळी याच शिंदे शिवसेनाच्या पक्षातील बरेचशे पदाधिकारी व कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम करत होते. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरिष्ठाचे आदेश पाळून मनापासून दीपक केसरकर यांचे काम केले. मात्र आताची झालेली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेला कोणाचे बूगडे घ्यावे लागले. ज्या विधान सभेत आमचा विरोधक होता त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आज सोसायटीच्या निवडणुकीत मदतीला घ्याव लागल हाच त्यांचा खरा पराभव आहे.
निवडणुका संपलेल्या नाहीत : चेतन चव्हाण
दोन सोसायटीच्या निवडणूका जर जिंकून संजू परब यांना स्वबळावर निवडणूक जिंकण्याची स्वप्न पडत असतील तर, निवडणूक संपलेल्या नाहीत, त्यांना येत्या निवडणूकात भाजपाची ताकद दिसेल.
विरोधी पक्षाची मदत हाच त्यांचा पराभव
दरम्यान दळवी म्हणाले विधानसभा निडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडी होती. राज्यात युतीचं सरकार आहे. असं असताना दोडामार्ग मध्ये सहकार क्षेत्रातील सोसायटीच्या निवडणुकीत शिंदे सेनेला उबाठा काँग्रेस पक्षाची मदत घ्यावी लागली हाच त्यांचा खरा पराभव आहे. असे सुधीर दळवी म्हणाले.