
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात आज होत असलेल्या दीडशे कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजनासह राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनास भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले नसल्यानं भाजप तर्फे या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचाही निषेध करण्यात आल्याचेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले.दरम्यान आज शहरात होत असलेले विकासकामांची भुमिपूजन भाजप स्वतंत्रपणे करणार असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.