कणकवली फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर भाजपची धडक...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 16, 2023 13:30 PM
views 76  views

कणकवली : फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कर्ज वसुली करिता तगादा लावत असताना दादागिरीची भाषा वापरत असल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवलीत जानवली पुला नजीक मनोहर शिल्प मधील चोलामंडलम या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात धडक देत ब्रांच मॅनेजरना घेराव घातला.

यावेळी कर्ज वसुलीला आमचा विरोध नाही. परंतु वसूल केलेल्या कर्जाची पावती दिली जात नाही. भरलेल्या पैशाची पावती दिली जात नाही. यासह अन्य आरोप कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यावर करण्यात आले. तसेच त्या कर्मचाऱ्याला येथे बोलवा व समोरासमोर बसून या विषयाचा मार्ग लावा असा अशी मागणी देखील यावेळी या फायनान्स कंपनीचे मॅनेजर रामचंद्र दळवी यांच्याकडे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी केली.

 

या घेरावा प्रसंगी काही कर्जदारांनी देखील वसुलीच्या पद्धतीवर आक्षेप घेतले. एकीकडे कर्ज वसुली करिता गाड्या वाटेत अडवूनच ताब्यात घेतल्या जातात. ही गुंडागिरीची स्टाईल बंद झाली पाहिजे. रीतसर कारवाई करा. त्याला आमचा विरोध नाही. पण गुंडागिरी करून चालणार नाही. मात्र यावेळी दळवी यांनी हे आरोप फेटाळत कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

तसेच हप्ते थकीत झाल्यानंतर दुसऱ्या टेबलवर प्रकरण वर्ग केले जाते. कंपनीची जी कार्यपद्धती आहे त्या पलीकडे जाऊन आम्ही काम करत नाही. कर्जदारांना सेटलमेंट साठी लोक न्यायालयात देखील संधी दिली जाते. अशी माहिती दळवी यांनी दिली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, यांच्यासह अन्य उपस्थित होते.