
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सावंतवाडीत दाखल होत आहेत. भारतीय जनता पार्टी व युवा नेते विशाल परब यांच्या कार्यालयात ते दाखल होणार असून सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत.
सावंतवाडी येथे नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वादानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सावंतवाडीत येत आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीतील कुरघोडीच्या पार्श्वभूमीवर ते सावंतवाडीत पत्रकार परिषद घेत आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय बोलणार ? याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहील आहे.










