भाजप कोकणात लागलय तयारीला ; राजापुरात राणेंची सभा

Edited by: भरत केसरकर
Published on: June 26, 2023 14:17 PM
views 79  views

राजापूर : भारतीय जनता पक्षाची आज रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रमोद जठार,राजन तेली अशी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. खरंतर राजापुरात रवींद्र साळवी यांच्या रूपाने उद्धव ठाकरे गटाचा आमदार आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे  उदय सामंत यांच सुद्धा वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपच्या या सभेचे नेमकं गुपित काय? याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. या सभेत राणे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेची भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या सभेच्या निमित्ताने  सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे  रणशिंग भाजप कडून फुंकल जाण्याची शक्यता आहे.  भाजपला हा मतदारसंघ मिळाल्यास प्रमोद जठार यांच नाव अग्रस्थानी आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विनायक राऊत करतात. त्यामुळे साहजिकच हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ शिंदे गटाला मिळावा अशा पद्धतीची मागणी होत असताना, भाजपने या मतदारसंघात घेतलेली सभा चर्चेचा विषय ठरली आहे.