
वेंगुर्ला: वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात भाजप पक्षाला जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले. यामुळे आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून पुन्हा राजन तेली यांना संधी मिळावी अशी मागणी आपण भाजप पक्ष श्रेष्टींकडे करणार असल्याचे भाजप युवामोर्चा तालुका सरचिटणीस नारायण कुंभार यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाला मोठे यश मिळले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात राजन तेलींच्या नेतृत्वाखाली अनेक ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्या. जिल्हाध्यक्ष म्हणून राजन तेली यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. यामुळे भाजप पक्षाकडून पुन्हा राजन तेली यांना संधी द्यावी आम्ही कार्यकर्ते जोमाने काम करू अशी मागणी करणार असल्याचे कुंभार म्हणाले.