ॲड. संजू शिरोडकर यांचा भाजपच्यावतीने सन्मान !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2024 09:45 AM
views 59  views

सावंतवाडी : शहरातील भाजपाचे कार्यकर्ते, सुवर्णकार ॲड. संजु शिरोडकर यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीवर व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपाच्या सावंतवाडी विधानसभा कार्यालयात, विधानसभेचे प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा निमंत्रित मनोज नाईक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे, मंडल उपाध्यक्ष दिलीप भालेकर, मंडल सरचिटणीस विनोद सावंत, नगरसेवक आनंद नेवगी, सोशल मिडीयाचे केतन आजगांवकर, वेंगुर्ले ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, किसान मोर्चा जि. चिटणीस  विजय रेडकर, किसान मोर्चा जि.का.का.सदस्य आनंद उर्फ बिट्टु गावडे व संदिप देसाई आदी उपस्थित होते.