देवगडमध्ये भाजपची निदर्शने...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 22, 2023 15:29 PM
views 165  views

देवगड : देवगड तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने जामसंडे येथील भाजप संपर्क कार्यालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करण्यात आला. ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात कंत्राटी भरतीचा आदेश काढला असताना तो आदेश रद्द करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत असल्याने हा निषेध देवगड तालुका भाजपच्या वतीने नोंदविण्यात आल्याचे भाजपचे माजी आमदार अजित गोगटे यांनी जामसंडे येथे बोलताना सांगितले.

या वेळी माजी आमदार अजित गोगटे, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,  जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, शहर अध्यक्ष दयानंद पाटील, योगेश पाटकर, गटनेते नगरसेवक शरद ठुकरूल, तन्वी चांदोस्कर, मनीषा जामसंडेकर, तालुका अध्यक्षा उषकला केळुस्कर, तन्वी शिंदे, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, स्वीकृत नगरसेवक रवींद्र चिंदरकर व अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.