भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री शिवकुमार यांची सावंतवाडी भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 16:58 PM
views 213  views

सावंतवाडी  : भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री शिवकुमार यांनी आज सावंतवाडी भाजपा कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी त्यांच 'हिंदुराष्ट्र दर्शन' हे पुस्तक देत स्वागत केले.

यावेळी त्यांनी सावंतवाडी विधानसभेतील सर्व भाजपा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष,माजी नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख,बूथ अध्यक्ष,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य व  कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोज नाईक, जिल्हा चिटणीस श्री महेश सारंग,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष श्री अजय गोंदावले,आंबोली मंडल अध्यक्ष श्री रवींद्र मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री महेश धुरी,शहर सरचिटणीस श्री परीक्षित मांजरेकर, शहर सरचिटणीस श्री विनोद सावंत, माजी नगरसेवक श्री आनंद नेवगी, माजी नगरसेवक श्री परिमल नाईक,माजी नगरसेवक श्री सुधीर आडीवरेकर आंबोली मंडल उपाध्यक्ष श्री राजन राऊळ,शहर उपाध्यक्ष श्री सत्यवान बांदेकर, सोशल मीडिया संयोजक श्री केतन आजगांवकर बूथ अध्यक्ष श्री हेमंत बांदेकर,उठ अध्यक्ष श्री गणेश कुडव , श्री प्रकाश नाईक, श्री रुपेश धर्णे,श्री मेघश्याम धर्णे,आंबेगाव शक्तिकेंद्र प्रमुख श्री योगेश गवळी  चराठा उपसरपंच श्री अमित परब उपस्थित होते.