सावंतवाडी मतदारसंघातील सदस्यता नोंदणी राज्यात अग्रेसर

नारायण राणेंकडून कौतुक
Edited by: विनायक गांवस
Published on: January 09, 2025 16:57 PM
views 100  views

सावंतवाडी : भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिक मेहनत घेऊन उचित उद्दिष्ट साध्य कराव अशा सूचना खास. नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सदस्यता नोंदणी ही राज्यात अग्रेसर असून  येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. भाजपच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सदस्यता नोंदणी मोहिम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सदस्यता नोंदणीचा आढावा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतला. सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात त्यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

 ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणूकीत सातत्याने मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला भाजपचा सदस्य म्हणून त्याची नोंदणी करून घ्या,  'भाजपला मत म्हणजे विकासाला मत ' हे प्रत्येक मतदाराच्या मनात रुजवा. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार त्यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे घराघरापर्यंत व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा व त्यांची भारतीय जनता पार्टी अधिकृत नोंदणी करून घ्या. हे अभियान १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून जिल्ह्याला दिलेले तीन लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करू त्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उद्दिष्ट पूर्ण करा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला अध्यक्षा श्वेता कोरेगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, युवराज लखमराजे भोंसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, मंडल अध्यक्ष महेश धुरी, रविंद्र मडगांवकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.